जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली बेकायदेशीर पणे प्रवासी वाहतुकदारानकडून मनमानी पद्धतीने पैश्याची जबरदस्ती वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे.
अवजड वाहतुकीसाठी प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला परवडणार असे दर ठरवुन दिले आहे परंतु आकारले जाणारे अवजड वाहतूक म्हणजेच प्रवासी वाहतुकीची गाडी वगळता अवजड वाहतुकीची पावती ही माल वाहतुकीसाठी असते. अर्थात ट्रक, पीकप, ट्रॅक्टर, आयवा, टेम्पो अश्या प्रकारचे जिथे माल असतो त्याच गाडीचे प्रशासनाने ठरवुन दिलेल्या दरानुसार, दर आकारले पाहीजे मात्र चंद्रपुर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर ग्रामपंचायत येथे कार,टवेरा, समो, ईतर प्रवासी वाहतुक गाड्याकडुन 100,200, जबरदस्तीने बेकायदेशीर रित्या पैसे वसुलीचा गोरखधंदा चालु आहे. रत्नापुर ग्रामपंचायत नी तयार केलेल्या वसुली पावती मध्ये जड वाहतुक परवाना अस नमुद केला असुन
त्या जड वाहतुक वसुलीला केराची टोपली दाखवत शासनाच्या नियमाला डावलुन ही बेकायदेशीर अवैध वसुलीचा गोरखधंदा नेमका कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे असा प्रश्न निर्माण झाला असुन त्या पावती मध्ये वसुलीकर्त्याची साक्षरी नाही. फोरव्हीलर चा उल्लेखच नाही कीती रुपये घेतले, अक्षरी रुपये याचा उल्लेखच नसुन ग्रामपंचायत चा शिक्का आहे. संबंधीत वसुलीकर्ता गणपत चौधरी नामक व्यक्ती आपली मनमानी करतो व वाहन चालकाशी चक्क उलटसुलट बोलतो. त्यामुळे साधारण वाहन मालकाची पिळवणुक होत असुन हा चालु असलेला गोरखधंदा तात्काळ था॓बवुन संबंधीत वसुलीकर्ता गणपत चौधरी याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यांत येईल असा इशारा प्रहार वाहन चालक संघटनेने दिला आहे. त्यामुऴे आता प्रशासन याकडे लक्ष घेऊन दोषीवर कारवाई करेल काय हे देखील पाहन अवचीत्याच ठरणार आहे.