Breaking News

जे. एम. पटेल महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा )- जे. एम. पटेल कॉलेज भंडारा येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण महिना साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष, ग्रीन क्लब, इको क्लब, एनसीसी व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पेपर बॅग, लिफाफे आणि कापडी बॅग बनविण्याचे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन गृहअर्थशास्त्र विभागाकडून नुकतेच करण्यात आले होते.

पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने व पॉलीथिन चा वापर कमी करण्याच्या उद्देशाने कापडी बॅग बनविण्याचे प्रशिक्षण सौ. गौरी ब्राह्मणकर यांनी दिले व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्याकरिता त्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजया कन्नाके यांनी पेपर बॅग व लिफाफा बनविण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष चे समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर, ग्रीन क्लब च्या समन्वयक, डॉ. संगिता कटरे, डॉ. अपर्णा यादव, डॉ. वैशाली लोणकर, डॉ. प्रतिभा पालीवाल, इको क्लब चे समन्वयक प्रा. रुपेश मोहतुरे, एन सी सी चे समन्वयक डॉ. जितेंद्र किरसान व एन एस एस चे समन्वयक प्रा. भोजराज श्रीरामे, डॉ. नैना सोनवाणे यांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर …

पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved