जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे संघरामगिरी येथे भव्य धम्म समारंभाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये हजारो उपासक उपासिका यांनी आपली उपस्थिती दर्शविली आणि त्यात शिवापूर बंदर येथील युवक तसेच धम्मबंधु प्रदीप मेश्राम आणि मित्र परिवार तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला तो म्हणजे या धम्म समारंभात येणाऱ्या उपासक उपासिकांना चाय व बिस्किट वितरण करण्याचा हा छान सेवाभावी उपक्रम दरवर्षी हे युवक राबवित असतात.
आपल्या मित्र परिवारा कडून जे काही धम्मदान प्राप्त होईल त्या दानातून हे मुल उपक्रम राबवित असतात.या मित्र परिवाराचा उपक्रम हा खुप छान आहे असे संघरामगिरी येथे धम्म समारंभास येणाऱ्या उपासक व उपासीकांचे म्हणणे आहे.