Breaking News

धृव पॅथॉलॉजी, सुविश्वास आणि मेट्रो लॅबला मनपाची नोटिस

नागपूर, ता. ११ : कोव्हिड संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशाचे उल्लंघन केल्याने शहरातील धृव पॅथॉलॉजी रामदासपेठ, सुविश्वास लॅब रामदासपेठ आणि मेट्रो लॅब धंतोली यांना नागपूर महानगरपालिकेद्वारे नोटिस बजावण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणीमध्ये तफावत, चाचणीची रियल टाईम नोंद नसणे याशिवाय बरेच अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित असल्याची बाब लक्षात येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नोटिसची कारवाई केली आहे.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात पथकाने ९ सप्टेंबर रोजी मनपाद्वारे कोव्हिड चाचणीची परवानगी देण्यात आलेल्या पॅथॉलॉजीची पाहणी केली. यामध्ये रामदासपेठ येथील धृव पॅथॉलॉजी, सुविश्वास लॅब आणि धंतोली येथील मेट्रो लॅबमध्ये आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशानुसार एकूण चाचण्या व त्यानुसार करावयाच्या ऑनलाईन नोंदीमध्ये तफावत आढळून आली. यासोबतच लॅबमध्ये होणा-या कोव्हिड चाचणीची रियल टाईम नोंद होणे आवश्यक असताना लॅबमध्ये नोंद न करता अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित ठेवल्याचे पथकाला निर्देशनास आले, यासंदर्भात मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार नोटिस बजावण्यात आले.

तिन्ही प्रयोगशाळेच्या (लॅबच्या) व्यवस्थापनाला शनिवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आपले लेखी स्पष्टीकरण सादर करावे लागणार आहे. संबंधित तिन्ही लॅबच्या प्रमुखांना स्वत: लॅबला मिळालेली परवानगी, जेव्हापासून तपासणी सुरू झाली त्याचा संपूर्ण दैनिक अहवाल पॉझिटिव्ह व निगेटिव्ह याबाबत माहिती, आजपर्यंत झालेल्या चाचण्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह तसेच आय.सी.एम.आर.च्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या चाचण्या, आरटीपीसीआर चाचणी करताना आय.सी.एम.आर.च्या पोर्टलवर नोंदणी करण्यात आल्याचा संपूर्ण लेखाजोखा यासह इतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीकरिता उपस्थित राहण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved