Breaking News

रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता होणार नाही : अति. आयुक्त जलज शर्मा

नागपूर, ता. ११ : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात सगळीकडून ऑक्सिजनची सर्वात जास्त मागणी येत आहे. नागपूरात सध्या खाजगी रुग्णालयात १३७७ बेडस् आणि शासकीय रुग्णालयात १४५० बेडस् उपलब्ध आहेत. कोव्‍हिड आणि नॉन कोव्हिड रुग्णांसाठी ४२०० जम्बो सिलेंडरची मागणी होत आहे. तसेच शहरात ४५०० जम्बो सिलेंडरचे उत्पादन होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी दिली.

श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, नागपूरात सध्या ३ शासकीय, २ धर्मदाय आणि ३३ खाजगी रुग्णालय कोव्हिड रुग्णांना सेवा देत आहेत. लवकरच नवीन कोव्हिड रुग्णालयांची यामध्ये भर पडणार आहे. त्यामुळे भविष्याची गरज लक्षात घेता ऑक्सिजनची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी मनपा काळजी घेत आहे.

नागपुरात कोव्हिड टेस्टिंगच्या संख्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. अगोदर दररोज २००० ते २५०० पर्यंत टेस्टिंग होत होती. आता मनपा व खाजगी रुग्णालयांच्या माध्यमाने ६०००० पर्यंत टेस्टिंग होत आहे, असेही श्री. जलज शर्मा यांनी सांगितले.

मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात दररोज आरोग्य विभागाशी संबंधीत अधिका-यांची टिम डेथ ॲनॉलेसिस करीत आहे. तीन ते चार तास होणा-या या आढावा बैठकीत शहरातील मृत्यूची कारणे शोधली जात आहेत. मृतांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना रुग्ण अंतिम टप्प्यात रुग्णालयांमध्ये दाखल होतात. त्यापूर्वी ते कधी कोव्हिडची चाचणी सुद्धा करीत नाही. कोरोनाची लक्षणे दिसल्यास लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा कोव्हिड चाचणी करून वेळेवर उपचार घेतल्यास त्यांचे प्राण वाचवू शकतात. नागरिकांनी मनपाच्या ५० चाचणी केंद्रांपैकी आपल्या नजीकच्या चाचणी केंद्रात सकाळी १० ते दुपारी २ चा सुमारास चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved