नागपुर :- उत्तर प्रदेश मधील हाथरस मध्ये घडलेल्या हत्याकांड च्या विरोधात युवासेना नागपूर शहर तर्फे “Justice for manisha” च्या घोषणा देत कॅडल मार्च व श्रद्धांजली चे आयोजन जिल्हा चिटणीस धीरज फंदी नेतृत्वात करण्यात आले. युवासेना तर्फे मनीषा ला श्रद्धांजली वाहण्यात आली .याप्रसंगी धीरज फंदी म्हणाले ,की उत्तर प्रदेश मध्ये कानून व्यवस्था कोडमलेली आहे.महाराष्ट्र चे नाव बदनाम करणारे, आता उत्तर प्रदेश मध्ये घडलेल्या हत्याकांडा बद्दल गप्प का? मागे मनमोहनसिंग यांच्या सरकार च्या काळात हत्याकांडा बद्दल स्मृती इराणी मनमोहन सिंग सरकार ला बांगड्या चपला भेट केल्या, आता या हत्याकांडा बद्दल मोदी सरकार ला स्मृती इराणी चपला बांगड्या भेट करेल का? असा सवाल फंदी यांनी केला.
तसेच माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांनी शोक व्यक्त केला यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक संदीप पटेल,शशीकांत ठाकरे, शहर समन्वयक निलेश तिघरे,शहर सचिव सलमान खान , शिवसेना उपविभाग प्रमुख सचिन डाखोरे, विक्रम राठोड, यश जैन, आशिष बोकडे,उपशहर प्रमुख बंटी धुर्वे,गौरव गुप्ता,विधानसभा समयनवक हर्शल सावरकर,उपशहर प्रमुख आशिष देशमुख, आकाश पांडे,सिद्धू कोमेजवर,शंकर वानखेडे,सीमारसिंग जोहर,राजेश बांडबुचे,सनी अग्रवाल,मनीष साखरकर, शुभम अग्रवाल, पावन सावरकर,सुमित, पिपाडीकर, निलेश सावरकर आदी उपस्थित होते!