नागपूर, ता. २ : इंग्रजांच्या देशविघातक जुलमी धोरणांना विरोध करण्यासाठी अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग स्वीकारुन १९४२ मध्ये ‘चले जाव’ असे ठणकावून सांगणारे व्यक्तीमत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती तसेच ‘जय जवान जय किसान’ चा नारा देवून भारतीय जनतेच्या मनात राष्ट्रभावना जागृत करुन १९६५ मध्ये भारत – पाकीस्तान युध्दात भारताचे खंबीरपणाने नेतृत्व करणारे व्दितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या ११६ व्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीचे दालनात राष्ट्पिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला महापौर श्री.संदीप जोशी, स्थायी समिती सभापती श्री.विजय (पिंटू) झलके व म.न.पा.आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी पुष्पहार अर्पण करुन म.न.पा.तर्फे अभिवादन केले.
यावेळी अति.आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, मिलींद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहा.संचालक नगररचना प्रमोद गावंडे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी हेमंत ठाकरे, आरोग्याधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, कार्य. अभियंता नरेश बोरकर, राजेश दुफारे, आर्किटेक्ट अशोक मोखा आदी उपस्थित होते.