
- जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमुर :- चिमूर पोलिस पोस्टे हद्दीतील अवैध दारू तस्करांविरुद्ध वेळोवेळी कारवाई करीत असून, काही दारू तस्कर पोलिसांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून अवैध मार्गाने दारू तस्करी करीत असतात, परंतु पो.नि. स्वप्निल धुळे पो.स्टे. चिमूर, व त्याचा पो.स्टाफ वेळोवेळी अवैध दारू तस्करांच्या मूसक्या आवळण्याचे काम करीत आहेत. दि. 01/10/2020 रोजी रात्री दरम्यान अनिकेत उर्फ दत्तू बावणे, आयुष दाभेकर व महेंद्र कोसरे, तिघे रा. चिमूर यांनी चावडी चौक चिमूर उमा नदीचे पुलाजवळ लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या पेट्या मोटारसायकलने पार्सल करीत आहे अशा खबरेवरून नमुद ठिकाणावर चिमूर पोलिसांनी जाऊन पाहिले असता 25 नग खोक्यांमध्ये 2,40,000/- रु. चा देशी दारू माल व एक जुनी वापरती जुपिटर मोटरसायकल किंमत 50,000 रु. असा एकूण 2,90,000/-.रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने फरार आरोपी नामे अनिकेत उर्फ दत्तू बावणे, आयुष दाभेकर व महेंद्र कोसरे, तिघे रा. चिमूर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद गुन्हा नोंद करण्यात आला!
सदरची कार्यवाही उप विभा. पो. अधि. वरोरा अति. कार्य. चिमूर निलेश पांडे, पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे, पो.स्टे. चिमूर यांचे मार्गदर्शनात पो.हवा. विलास निमगडे, पोशि सचिन खामनकर, भारत घोळवे, सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, सतीश झिलपे, शंकर बोरसरे, हरीश येरमे यांचे पथकाने पार पाडली.