
- २६ दिव्यांग चे टपली मतदान
- १७९ मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार
नागपूर दिनाक २९:- विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी ८० वर्षा पेक्षा अधिक तसेच डिव्यांगासाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली असून जिल्ह्यात १७९ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली.
टपाली मतदानासाठी जिल्ह्यात २१८ मतदार असून आजपर्यंत ( २९ नोव्हेंबर) पर्यंत १७९ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. मतदाराच्या घरी जाऊन टपाली मतपत्रिका मतदारांना उपलब्ध करून दिल्या आहेत, घरूनच मतदानाचा अधिकार बजावलेल्या मतदारांमध्ये ३३ दिव्याग मतदार पैकी २६ तर ८० वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या १८५ मतदारा पैकी १५३ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे.