Breaking News

“वंजारी कुटुंबियांनी समाजालाच लुटले”

  • खासदार रामदास तडस यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या वतिने निषेध

नागपुर :- नागपुर पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चे उमेद्वार अँड अभिजीत वंजारी यांच्यावर त्यांच्याच समाजाचे असलेले खासदार रामदास तडस यांनी गंभीर टिका केली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली तर दुसरी कडे खासदार तडस यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा ने निषेध केला आहे.

रविवारी एका प्रसार माध्यमाचा वृत्तातुन खासदार तडस यांनी अशी गंभीर टिका केली त्यांचा या टिकेमुळे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त करत पुढीलप्रमाणे आपले मत नोंदविले –
खासदार तडस जी आपण वंजारी परिवारावर या निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात टिका, आरोप केलेत तेही निवडणूकी च्या रिंगणात प्रथम क्रमांकावर असनाऱ्या एका तेली समाजाच्या उमेदवारावर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश अध्यक्ष या नात्याने असे वक्तव्य आपल्याला अशोभनिय आहे.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चे नागपुर शहर अध्यक्ष श्री योगेश न्यायखोर यांनी म्हटले रामदासजी तडस यांन्हा त्यांच्या निवडणुकी मध्ये समाज बांधवांनी मदत केली आणि ते खासदार झाले, पण आता त्यांना आपल्या पक्षाची काळजी आहे समाज बांधवांची काळजी नाही म्हणून त्यांनी जे अभिजितजी वंजारी बद्दल निवडणुकीच्या आखरी टप्यात आपल्या समाज बाधंवाची बदनामी केली आणि काही सामाजाचे काम नाही होत मनुन त्यांनी आपल्या पक्षाचे काम करावं समाजाचे नाही आम्ही या टीपणी चे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज नागपुर च्या वतीने निषेध करतो.

तसेच इतर समाजबांधवानी सुद्धा खासदार तडस यांच्या वक्तव्याचे निषेध केले आहे त्यामध्ये कृष्णरावजी हिंगणकर महाराष्ट्र प्रदेश महासचिव महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, सुखदेव वंजारी प्रदेश अध्यक्ष युवक आघाडी, योगेशजी न्यायखोर नागपूर शहर अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, आदित्य पंधरे विभागी अध्यक्ष पूर्व विदर्भ युवक आघाडी, सुरजजी फंदी नागपूर शहर अध्यक्ष युवक आघाडी, निलेश तिघरे अध्यक्ष उत्तर नागपूर विभाग युवक आघाडी, पंकज कुंभलकर अध्यक्ष मध्य नागपूर विभाग युवक आघाडी, विजय साहु अध्यक्ष पूर्व नागपूर, गौरव गुप्ता (शाहू)अध्यक्ष पूर्व नागपुर युवक अघाड़ी तसेच समस्त प्रदेश पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी यांनी खासदार रामदास तडस यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी …

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved