
दवलामेटी(प्र) :- वाडी लगत लावा ग्रा.प क्षेत्र अंतर्गत निर्मल सोसायटीत गुरुवार ला सकाळी एका तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. माजी जि. प सदस्य सुजित नितनवरे यानी दिलेल्या माहिती प्रमाणे मृतक सूरज दिलीप कठाने वय 25 वर्ष हा तरुण युवक आई वडिलान सोबत राय वाटिका जवळ निर्मल सोसायटी मध्ये राहायचा . मृतक खाजगी कम्पनी मध्ये कार्यरत होता . घटनेचा दिवसी त्याची आई बाहेर गावी गेली होती. भाऊ कामावर गेला होता . फक्त वडिल घरी होते . मृतक ने वडिलांना दुचाकीत पेट्रोल भरायला पाठवले . ते घरा बाहेर गेले असता , सूरज ने घरातील एका खोलीत सीलिंग फॅन ला दोरी चा सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली .
जेव्हा वडिल पेट्रोल भरून परत आले तेव्हा एका खोलीत मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघून धक्का बसला , आणि आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले या घटने ने नागरिक घराकडे आले . फासा वर लटकल्या मुळे त्याची मृत्यू झाली होती . वाडी पुलीस ला घटने ची माहिती दिली गेली . पोलीस घटना स्थळी पोहचून पंचनामा केला . नंतर मृत देहाला पी एम रिपोर्ट साठी नागपूर ला पाठवले . आत्महत्या चे कारण समजुसकले नही .