Breaking News

ऑनलाईनच घेता येणार गणेशाचे दर्शन – जिल्हाधिकारी

नागपूर दि. 09 : गणेशोत्सव साध्या पध्दतीने करण्यासंबंधीत जिल्हा प्रशासनातर्फे नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांमध्ये आता गणेश मुर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यात प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे उपलब्ध करून देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज कळविले आहे.
कोरोनाच्या संसर्ग वाढीला गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी कारणीभुत ठरू नये. यासाठी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हयातही मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

गणेशोत्सव साजरा करतांना सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे सुसंगत व मर्यादित मंडप उभारावे. सार्वजनिक मंडळाची सजावट साधी असावी. सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती 4 फूट तर घरगुती गणपती 2 फुटांचा असावा. शक्यतो घरातील धातु/संगमरवर या मुर्तीचे पुजन करावे. शाडूची किंवा पर्यावरणपुरक मुर्ती असल्यास घरी विसर्जन करावे. शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्तीचं घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावे. घरी विसर्जन शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणपती आणतांना वा विसर्जनासाठी मिरवणूक काढता येणार नाही.

नागरिक देतील ती देणगी मंडळांनी स्वीकारावी. मंडप परिसरात गर्दी होऊ देऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे, रक्तदान यांच्या आयोजनावर भर द्यावा. आरती, भजन, किर्तन करतांना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
गणेश मंडळानी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेबसाईट, ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे दर्शनाची सोय करावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी. राज्यातली कोरोना विषाणूची संसर्गाची परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने गणेशोत्सवासाठीची मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे. गेल्यावर्षीही कोरोनाच्या जागतिक साथीमुळे राज्यामध्ये गणेशोत्सवासाठीच्या विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. विसर्जना आधीची आरती घरीच करून, मग मूर्ती थेट विसर्जनासाठी आणावी. एकाच इमारतीतल्या अनेक घरगुती गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.
कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनवर्सन, आरोग्य व पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबं‍धित महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करण्यात यावे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved