
दवलामेटी :- वंचित बहुजन आघाडी शाखा दवलामेटी चे उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत रामटेके यांचा नेतृत्त्वात बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन दवलामेटी परिसरातील महिलांनी तिजारे ले आऊट येथील पक्षाचा विशेष सभेत पक्ष प्रवेश केला.
नागपूर ग्रामीण भागात दवलामेटी येथे बड्या राजकीय पक्षाची मत्तेदारी ला चोख प्रत्युत्तर देऊन प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुके मध्ये भाग घेऊन वंचित बहुजन आघाडी पक्षाने मुसंडी मारत सर्वात जास्त सदस्य निवडून आणले व सरपंच पदाचा मान मिळविला निवडणुका होऊन चार ते पाच महिने झाले असता परिसरातील माहीला व पुरुष पक्षात सामील होण्यासाठी आतुर असल्याचे सदर कार्यक्रमातून लक्षात आले.
परिसरातील महिला बरेचं दिवसा पासून पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता मंगला कांबळे यांच्याशी संपर्कसाधून पक्ष प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. परंतू कोरोना चा परिस्थितीत मुळे आता पर्यंत ते शक्य झाले नव्हते. आज पक्षाचा विशेष सभेचे आयोजन तिजारे ले आऊट येथे करण्यात आले होते. तेव्हा , व्यावसायिक व सामजिक क्षेत्रात अगरेसर असलेल्या महिला रिंकू नारनवरे ( गौरखेडे ), पायल पहुरकर (गौरखेडे), भागेश्री मेश्राम, अर्चना जीवने व ईतर महिलांनी हेटी शाखेचे अध्यक्ष अन्नवर जी अल्ली यांचा अध्यक्षा खाली पक्ष प्रवेश केला. संचालन ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मेश्राम व आभार प्रदर्शन संघटक रोहित राऊत यांनी केले.
यावेळी राजाराम गवई, ईश्वर राऊत, प्रभुदास कांबळे, सुधाकर वासनिक, जयकुमार नाईक , इंगळे साहेब, मांडलिक साहेब, मधुकर गजभिये, वामन जी वाहने, छत्रपती शेंद्रे, प्रवीण अंबादे, संदीप सुखदेवे, रवी पाखरे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना बनसोड , शुभांगी पाखरे, प्रिती वाकडे, श्वेता सुखदेवे, मंगला कांबळे, चैत्रा पाटील, वर्षा बारमाटे, शिंगाळे ताई व मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते उपस्थित होते.