जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-तिन अपत्ये असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ (ज-१) आणि कलम १६(२) नुसार पळसगांव ता चिमूर ग्रामपंचायतीच्या सदस्य प्रभाकर बाबुराव गजभिये हे ग्रामपंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरले आहेत.चिमूर तालुक्यातील पळसगांव ग्रामपंचायतीची आठ महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. ज्यात प्रभाकर बाबुराव गजभिये हे या प्रभाग ३ मधून निवडून आले होते. त्यांना सन २००१ नंतर जन्मास आलेल्या अपत्यांची संख्या तीन आहे.
मात्र, नामनिर्देशनपत्र भरताना व शपथपत्र दाखल करताना त्यांनी तीन अपत्य नसल्याची माहिती दिली. मात्र प्रभाकर बाबुराव गजभिये यांना २००१ नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या तीन असून त्यांना अपात्र घोषित करावे, अशी तक्रार वर्षा लोणारकर माजी पंचायत समिती सदस्य यांनी यांनी ९ आगस्टला जिल्हाधिकारी अजय गूलह्वाणे यांच्याकडे केली होती.ग्राम पंचायत सदस्य अपत्यबाबतचा कोणताही पुरावा त्यांनी चौकशी समितीसमेार सादर केला नाही. त्यामुळे दाखल तक्रारीनुसार प्रभाकर बाबुराव गजभिये यांना सन २००१ नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या तीन असल्याचे दिसून आल्याने ते सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरत असल्याचा निर्वाळा जिल्हा अधिकारी यांनी दिला आहे.
ग्राम पंचायतला अपात्रचे आदेश मिळाले असून ग्रामसेवक यांनी मला, सदस्य व तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे माहिती दिली आहे.
सरिता विकास गुरनुले सरपंच, पळसगांव (पि)