Breaking News

चिमूर शहरात रेती माफियांचा मोठया प्रमाणावर सुळसुळाट

महसूल अधिकारी व तलाठी झोपेत

दैनंदीन चोरीच्या रेतीवर मोठ – मोठी बांधकाम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – चिमूर तालुक्यामध्ये कुठेही रेतीघाट लिलाव झाले नसतांना खडसंगी , मासळ , सोनेगाव बेगडे , चिमूर , नेरी , शंकरपूर , जांभुळघाट , भिसी या ठिकाणी दैनंदिन मोठया प्रमाणात हायवा , ट्रॅक्टर , ट्रक , यांच्या माध्यमातून रेतीची उलाढाल सुरू असून रात्रपाळी पोलीस प्रशासन व महसूल अधिकारी , तलाठी यांचे दुर्लक्ष होतांना दिसून येत असून यांच्या त्रासामुळे हायवेवरील तसेच संपर्कात येणाऱ्या रोड लगतच्या जनतेला याचा नाहक त्रास तसे ध्वनी प्रदूषनाचा त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे त्या जनतेची झोप होत नाही याची माहिती तसेच तक्रार सुद्धा उपविभागीय अधिकारी , तहसीलदार , तलाठी लोकप्रतिनिधी यांना दिली असतांना सुद्धा दुर्लक्ष का ? रेतीचे दर सोन्याच्या भावाने वाढलेले आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना कुठलेही बांधकाम कराचे म्हटले कि मोठी रक्कम रेतीवाल्यांना मोजावी लागते. घरकुल मिळाले असले तरी त्या रक्कमेच्या किमतीमध्ये त्याचे घराचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही याकडे सुध्दा आधिकारी लक्ष का देत नाहीत ? शासकीय काम असेल आणि परवडण्यासारखे नसेल तर थोडक्यात काम सुरू करून त्यास वाढीव रक्कम मंजूर करण्यात येत असते.

परंतु शासकीय योजनेत घरकुल असून त्याकडे मोठया प्रमाणावर दुर्लक्ष होतांना दिसत असते.५ ब्रास रेती सुद्धा त्यांना शासकीय परिपत्रकानुसार मोफत उपलब्ध करून दिल्या जात नाही.याची सर्वसामान्य नागरिकांना माहिती सुद्धा नाही.अधिकारी यांची माहिती का देत नाहीत ? असे नेहमी सुरू राहिल्यास सामान्य माणूस हा कुणाकडे दाद मागेल अशी अवस्था झालेली दिसून येत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved