Breaking News

वडधामना स्थित हाय लॅन्ड मनोरंजन पार्क तालावात सापडला तरुणाचा मृतदेह

मृतकाची ओळख अजून पटली नाहि

प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी (प्र)

दवलामेटी(प्र) :- वाडी पुलीस स्टेशन अंतर्गत वडधामना-सुराबर्डी स्थित हाय लॅन्ड मनोरंजन पार्क चा तालावात सोमवार ला एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
प्राप्त माहितनुसार या पार्क मध्ये खदान सारखे पाणी भरे तलाव आहे. ज्यामध्ये व्यवसथापना कडून देखरेख असते व पर्यटकान साठी सशुल्क आकारून बोटिंग सेवा दिली जाते . म्हणजेच या क्षेत्रात सुरक्षा गार्ड आणि कर्मचाऱ्यांची देखरेख असते . या तालावां जवळील परिसरातील ढीवर सुधा मत्स्य पकडण्या साठी या तलावाचा वापर करतात . सोमवार ला दुपारून वाडी पोलिसांना सूचना मिळाली की या तलावात एक बोट मध्ये मृत देह आढळले .वाडी पुलीस निरीक्षिक ललिता तोडासे आपल्या चमू सोबत घटना स्तळी पोहचले तिथे एका तरुणाचा मृतदेह बोट मध्ये आढळले .कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत शरीरावर फक्त बनियन-निकर होती . मृतकाची ओळख अजून पटलीनसल्याने, पोलीस चमूने पंचनामा करून नागपूर ला पुढील तपासणी साठी पाठवले. घटने संधर्भात वाडी पुलीस निरीक्षिका ललिता तोडासे नी सांगितले की आम्हीं सखोल तपास करू. पी एस आय ढवळे पुढील तपास करित आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved