
= घोडारथ यात्रेच्या मिरवणूकिने भारावले बालाजी भक्त,
= हजारों भाविकानी घेतले दर्शन,
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-३९५ वर्षाची परंपरा असलेल्या चिमुर क्रांती नगरीतिल घोडारथ यात्रेला 5 फेब्रूवारी पासून सुरुवात झाली, मात्र प्रत्यक्षात सोमवार दिनांक 14 फेब्रूवारीला रातघोड्या पासून घोडारथ यात्रेला प्रारंभ झाला, रातघोड्याच्या मिरवणूकित हजारों भाविकानी सहभागी होत चिमुरकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेतले, पेशवाईच्या काळात जीर्णोद्धार झालेल्या या श्रीहरी बालाजी मंदिराला ३९५ वर्षाचा इतिहास आहे, मंदिराची वास्तु भोसलेकालींन आहे, चिमुर येथील श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रेला २४९ वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली, आजही तेवढ्याच उत्साहात यात्रेत महाराष्ट्रासहीत छत्तीसगढ़ मध्यप्रदेश राज्यातील भाविक भक्त दर्शन घेण्यास मोठ्या संखेने गर्दी करतात,
श्रीहरी बालाजी महाराजांच्या घोडायात्रा मिरवणुकीपूर्वी विधिवत पूजाअर्चा करण्यात आली, रात्री १२ वाजता भक्तिमय वातावरनात फटाकयाच्या आतिशबाजीने मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली, ही मिरवणुक श्रीहरी बालाजी मंदिर ते नेहरू चौक, अहिंसा चौक, मार्केट लाईन, शिवाजी चौक, ते शहीद बालाजी रायपुरकर चौक असी फिरत सकाळी ०५:४५ वाजता बालाजी मंदिरात विर्सजित केली, या मिरवणुकीमधे महाराष्ट्रासहित छत्तीसगढ़, मध्यप्रदेश येथील हजारों भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते, भक्ति संगीताच्या तालावर बालाजी भक्तांची पाऊले थिरकत होती, गोविंदा गोविंदाचा जयघोष सात्त्त्याने सुरु होता, महाशिवरात्रि पर्यंत चालणाऱ्या या यात्रेत चिमुर नगरित मनोरंजनच्या साधनासह मौत का कुँवा, आकाश पाळने, मीणा बाजार या सह मिनी सर्कस यात्रेकर्यान्चे लक्ष्य वेधत आहे, नगर परिषद चिमुर व श्रीहरी बालाजी देवस्थान च्या वतीने भक्तांसाठी विविध सोई पुरविल्या आहेत,
पोलिसांनी वोढला बालाजी महाराजांचा रथ
श्रीहरी बालाजी महाराजांचा रथ ओढायला नाही मिळालातर चालत्या रथाला हातानी स्पर्श करुण धन्यता माननारे भाविक भरपूर असतात, पन कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून अहोरात्र कर्तव्य बाजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनापन रथ ओढन्याचा मोह आवरता नाही आला, सहायक पोलिस निरीक्षण मंगेश मोहोड़ यांचेसह वरोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षण राजकुमार मड़ावी, पोलिस उपनिरीक्षक अलीम शेख, भीष्मराज सोरते, पोलिस शिपाई कैलास आलम, प्रमोद गुट्टे, रामेश्वर दोईफोडे यानी सुधा शहीद रायपुरकर चौक ते श्रीहरी बालाजी मंदिर पर्यंत रथ ओढ़त सर्व भाविक भक्तांचे लक्ष्य वेधले,
रथ यात्रेदरम्यांन रथयात्रा यशस्वी करण्यासाठी श्रीहरी बालाजी देवस्थान समिति व श्रीहरी बालाजी महाराज भक्त मंडळ यानी अथक परिश्रम घेतले, सदर रथ यात्रेदरम्यांन उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सांगले यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षण मनोज गभने यांचे नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षण मंगेश मोहोड़, पोलिस उप निरीक्षक अलीम शेख, भीष्मराज सोरते, राजू गायकवाड़ यांचे सह सर्व पोलिस कर्मचारी यानी चोख बंदोबस्त ठेवला, चोख बंदोबस्त मुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही,