
पत्रकार-जगदीश का. काशिकर
नवी मुंबई: श्रमिक शिक्षण मंडळाचे एफ जी नाईक कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कोपरखैरणे आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात, १४ फेब्रुवारी २०१९ पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सदर आदरांजलीच्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय स्वयंससेवकांनी अमर जवान स्मारकाची प्रतिकृती तयार करून सर्वांनी त्यास आदरांजली वाहिली व पथनाट्य सादर करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून विद्यार्थ्यांमधे देशभक्तीची भावना जागृत केली व मुलांमधे सैन्य भरती बद्दल जनजागृती केली . ह्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री प्रताप महाडिक सर ह्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहून आपले विचार मांडले व सर्व विद्यार्थ्यांना भेदभाव त्यागून एकीने राष्ट्राचे हित जोपासण्यासाठी व भारत देशाचे नाव उज्वल करण्यासाठी आव्हान केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे
प्राचार्य श्री प्रताप महाडिक यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक म्हणून आपण सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेवर कायम दक्ष राहून कार्य करण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंससेवकांनी केले व सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.अनुष्का निकाम व कु. तनूजा देशमुख ह्यांनी केले.श्रध्दांजली कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका जयश्री दहाट आणि प्राध्यापक संदेश सूर्यवंशी ह्यांनी केले.