Breaking News

ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांना श्रध्‍दांजली

पत्रकार-जगदीश का. काशिकर

मुंबई: ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांचे आज दुःखद निधन झाले, त्‍याबद्दल लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तिव्र दुःख व्‍यक्‍त केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्‍चे शिवसैनिक अशी त्‍यांची ओळख होती. वयाच्‍या ८१ व्‍या वर्षी राहत्‍या घरी त्‍यांचे निधन झालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्‍थापना केल्‍यानंतर श्री. सुधीर जोशी यांनी शिवसेना वाढीसाठी बाळासाहेबांसोबत मोठं काम केलं. १९७२ मध्‍ये ते मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदार संघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा-शिवसेना युती सरकारच्‍या कार्यकाळत त्‍यांनी महसुल व शिक्षण मंत्री म्‍हणून काम पाहिले होते.

आ. मुनगंटीवार यांनी स्‍व. सुधीर जोशींबद्दल आठवणी सांगताना त्‍यांच्‍या बरोबर युती शासनाच्‍या काळात मंत्री म्‍हणून काम केल्‍याचे सांगीतले. अतिशय मनमिळावू व निगर्वी व्‍यक्‍तीमत्‍वाचे श्री. सुधीर जोशी धनी होते, असेही आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले. मी त्‍यांच्‍या कुटूंबियांना या दुःखातुन सावरण्‍याची शक्‍ती परमेश्‍वर त्‍यांना देवो अशी प्रार्थना करतो.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved