
= हजारों भाविक भक्तांचा उसळला जनसागर
= चिमूर पोलिस विभागाकडून महाप्रसाद वाटप
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-मिति माघ शुद्ध वसंत पंचमी दिनांक 5 फेब्रूवारी 2022 रोजी श्रीहरी बालाजी महाराज घोड़ा रथ यात्रा नवरात्रि महोत्सवाला हरिभक्ति परायण विनोद बुवा खोंड महाराज यांच्या भागवत प्रवचाने सुरुवात झाली होती आज माघ कृष्ण दिनांक १७ फेब्रूवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने समाप्ति करण्यात आली, हजारों भाविकानी काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेतला,
चिमूर क्रांति नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी घोडारथ यात्रा महोत्सवाची सुरुवात ५ फेब्रूवारी 2 रोजी हरिभक्ति परायण विनोद बुवा खोंड महाराज यांचे नारदीय कीर्तनाने सुरु झाली, मिति माघ शुद्ध नवमी दिनांक १० फेब्रूवारी २०२२ ला गरुड़ राज वाहन परिक्रमा सम्पन झाली,
मिति माघ शुद्ध एकादशी १२ फेब्रूवारी ला अंजनिपुत्र मारोती वाहन यानी चिमुर नगरात परिक्रमा पूर्ण करत रथ यात्रेच्या मार्ग खुला करुण दिला, मिति माघ शुद्ध त्रयोदशी दिनांक १४ फेब्रूवारी ला भगवान श्रीहरी बालाजी महाराज यानी अश्वारूढ़ रथावर सवार होऊन परिक्रमाच्या माध्यमातून हजारों भाविक भक्ताना दर्शन दिले, माघ कृष्ण १ दिनांक १७ फेब्रूवारीला दुपारी १२ वाजता हरिभक्ति परायण विनोद बुवा खोंड महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सुरुवात झाली दुपारी २ वाजता पुजारी शुभम भोपे यांचे हस्ते चंबु आरती करून दही हांडी फोडून नवरात्रि महोत्सवाची सांगता करण्यात आली, काल्याच्या निमित्याने परिसरातील हजारों भाविक भक्तानि श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेतले,
श्रीहरी बालाजी महाराज घोड़ा रथ यात्रा महाशिवरात्रि उत्सवापर्यंत सुरु राहील असी सूचना श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मंगेश भलमे, विश्वस्त एडव्होकेट चंद्रकांत भोपे, निलम राचलवार डॉ. दिपक यावले व्यवस्थापक अरविंद गोठे यानी केली, श्रीहरी बालाजी महाराज भक्त मंडळ चिमूर यानी नवरात्रि महोत्सवात स्वैछेंने अथक सेवा दिली.
घोडायात्रा निमित्य पोलिस विभागातर्फे माहाप्रसाद वाटप
श्रीहरी बालाजी माहाराज घोडारथ यात्रेच्या निमित्याने पोलिस स्टेशन चिमूर तर्फे पोलिस निरीक्षक मनोज गभने, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहड, पोलिस उपनिरीक्षक अलीम शेख पोलिस अमलदार शुक्रराज यादव, मोहन धनोरे, सचिन खामनकर, प्रमोद गुट्टे, इत्यादिनच्या उपस्थितित गोपाल काल्याच्या निमित्याने श्रीहरी बालाजी भक्तांनी जूना बसस्टॉप येथे महाप्रसाद वाटप करण्यात आले.