Breaking News

चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सट्टा (मटका) व्यवसाय सुरू

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका हा नावाजलेला आहे याठिकाणी कसल्याही प्रकारे रोजगार निर्मिती नाही.तरीही मोठ्या प्रमाणावर बाजापेठ , बँकिंग सेक्टर , पतसंस्था , फायनान्स सेक्टर व बियर बार तसेच लॉटरी सेंटर यांची संख्या आहे.परंतु रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने १०० किमी अंतर जनतेला दैनंदिन गाठावे लागते.असे असतांना सुद्धा चिमूर लगत असलेल्या नेरी , पळसगाव , पिपरडा , खडसंगी , बोथली , वहानगाव , जांभुळघाट , भिसी , शंकरपूर अशा छोट्या – मोठ्या गावांमध्ये सट्टा ( मटका ) हा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.

परंतु यावर कारवाही फार कमी प्रमाणात होत असते.याचे कारण म्हणजे हे व्यवसाय मोठ – मोठ्या नेत्यांच्या आशिर्वादाने सुरू असल्याची नेहमी ठिक – ठिकाणी चर्चा असते यापासून मिळणारा नफा हा कोट्यवधी च्या घरात असतांना पोलीस प्रशासन या व्यवसायावर आढा घालण्यासाठी कसलेही निर्बंध लावीत नाही असे का ? असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगार युवक वर्गात पसरलेला आहे.या व्यवसायामुळे अनेक घरे – परिवार उध्वस्त झाले आहेत याची पोलीस प्रशासनाला खात्री असूनही मोठ्या प्रमाणावर या अवैध सट्टा व्यवसायास चालना का देत आहेत याची सध्या मोठ्या प्रमाणावर चिमूर तालुक्यात चर्चा रंगली असून यावर कठोर असे निर्बंध लावून नायक चित्रपट तसेच सिंघम चित्रपटातील समाज प्रबोधनात्मक तसेच भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या कलाकृतीचे अनुकरण करून दाखविणारा कलावंत कलाकार याची भूमिका साकार करणाऱ्या निर्भीड कलाकाराची गरज आज चिमूर तालुक्याला भासत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved