
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : -रमेश खेरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सेवादल तालुका अध्यक्ष यांनी तत्कालीन नगर परिषद च्या नगराध्यक्ष शिल्पाताई राचलवार यांच्या कार्यकाळात झालेला चुरी घोटाळा प्रकरणी चौकशी करण्याबाबत चे उप विभागीय अधिकारी यांना दिले निवेदन,
दिनांक.२२/०२/२०२२ नगर परिषद चिमूर अंतर्गत येणाऱ्या प्रभागामध्ये अनेक विकासात्मक कामे सुरु होती व आताही आहे. तत्कालीन नगराध्यक्ष शिल्पाताई राचलवार यांच्या कार्यकाळात विकासात्मक कामाकरीता खरेदी करण्यात आलेली चुरी हि जास्त रक्कम देऊन खरेदी करण्यात आलेली आहे. तरी याबाबत आपण सदर प्रकरणाची रितसर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी असे मत निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे.