Breaking News

मका खरेदी करण्याकरीता खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील मका खरेदी करण्याकरीता शासन निर्णयातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांची एन.ई.एम.एल पोर्टलद्वारे दि. 11 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करण्याचे निर्देश आहे.

त्याअनुषंगाने शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीच्या अधिन राहून दिलेल्या कालावधीअखेर पणन हंगाम 2021-22 मधील मका खरेदीकरीता कृषी उत्पन्न बाजार समिती मूल, सावली तालुक्यातील पाथरी सेवा सहकारी संस्था मर्यादीत, पाथरी तर गोंडपिपरी तालुक्यातील कोरपणा ता.ख.वि. सह. संस्था, गोंडपिपरी या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी.

शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक पासबुक इत्यादी संपूर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए. आर. गोगिरवार यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved