
शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/ब्रम्हपुरी:-विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोदिया व भंडारा हे जिल्हे भात पिकासाठी प्रसिद्ध आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर व इतर तालुक्यातील तांदूळ उच्च प्रतिचा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील तांदळाला मोठी मागणी आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही घानावर आधारीत एकही प्रक्रिया उद्योग शासनातर्फे राबविण्यात आला नाही. परिणामी हा जिल्हा धानावर आधारीत प्रक्रिया उद्योगापासून विरहीत आहे. शिवाय उद्योगधंद्याची वानवा असल्यामुळे जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,
त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादित धानाला उचीत दर प्राप्त व्हावा, या उदात्त हेतूने राज्य शासनाने व केंद्र शासनाने धानावर आधारीत प्रक्रिया उद्योग/ मेगा क्लस्टर उद्योगधंद्यांची उभारणी जिल्ह्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य नगरी म्हणून प्रचलित असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यात करण्यात यावी. मेगा क्लस्टर उद्योगधंद्याची उभारणी केल्यामुळे कुक्कुसापासून राईस ब्रॉन ऑईल, कोंढयापासून बीज निर्मिती प्रकल्प, औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधने निर्मिती आदी करता येईल. परिणामी उद्योगधंद्याची उभारणी केल्यामुळे जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर व इतर तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल,
शेतकऱ्यांना व बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी, चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकासाठी प्रचलित असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यात धानावर आधारीत मेगा क्लस्टर उद्योगांची उभारणी करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांच्या नेतृत्वात मान. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या मार्फत निवेदन प्रेषित करण्यात आले,
प्रसंगी माजी शहर प्रमुख शामराव भानारकर, उपतालुका प्रमुख केवळराम पारधी, रामेश्वर राखडे, भाऊराव ठोंबरे, चिमूर विधानसभा समन्वयक, मंगेश ठोंबरे चिमूर, विभाग प्रमुख गुलाब बागडे, मोरेश्वर अलोने, रामचंद्र मैंद , गणेश बागडे, मंगेश कावळे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते._