Breaking News

दिनांक 29 नोव्हेंबरला कन्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहारचे नेरी सीरपुर रोडवर चक्का- जाम, रस्ता रोको आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-नेरी ते सिरपूर बोथली व नवतळा ते काजळसर या मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या विरोधात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री मा बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार सेवक प्रवीण वाघे प्रहार सेवक शेरखान पठाण यांच्या नेतूत्वाखाली उदयाला सिरपूर चौकात रस्ता रोको ,चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.नेरी परिसरातील नागरिकांच्या मागण्यांना न्याय मिळावा व मुजोर रस्ता बनविणाऱ्या कंपनीला धडा शिकवून विविध मागण्याचे पूर्तता करण्यासाठी प्रहार संघटना चक्का जाम आंदोलन करणार. सदर आंदोलनात आपल्या प्रमुख मागण्यांना घेऊन प्रहारचे सेवक असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलनात सहभागी होणार आहेत.

सदर मागण्यामध्ये मागील तीन वर्षांपासून नेरी सिरपूर बोथली काजळसर नवतला येथील मंदगतीने सुरू असलेले रस्त्याचे काम जलदगतीने करून 30 डिसेंबर पर्यंत पूर्ण करावे तसेच पुलाचे काम सुद्धा पूर्ण करावे नेरी सिरपूर चौरस्ता तात्काळ रस्ता बनवावा सिरपूर ग्रा.प.चे पाणी पाईप व रस्ता तयार केले त्याचे मोबदला तात्काळ द्यावे पुलात पडून मरण पावलेल्या युवकांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या वळण रस्त्याचे मोबदला म्हणून रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी तसेच रस्ता अपघातात युवकाचा मृत्यू झाला त्याचा नाहक बळी गेला त्यासमुळे त्याचे कुटुंब उघड्यावर आले त्याविरोधात कंपनी वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे अश्या प्रमुख मागण्यासोबत अनेक विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटना चक्का जाम आंदोलन करणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामाने शिक्षक त्रस्त : सुरेश डांगे

सेवानिवृत्तीनिमित्त रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांचा शिक्षक भारतीतर्फे सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भावी पिढी …

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved