
विर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-संविधान दिना निमित्त आंबेडकर चौक वरोरा येथे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले तसेच 26/11 मुंबई भ्याड हल्ल्यात झालेल्या शहीद जवानांना शहीद योगेश डाहुले स्मारक वरोरा येथे भावपुर्ण आदरंजली वाहिली.
त्यावेळी स्वराज निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहले अश्या संविधानची देशाला गरज आहे अशे व्यक्तव उपस्थित मान्यवराणी केले.
तसेच शालेय विद्यार्थीना सोबत घेऊन शिवसेना पदाधिकारी यांनी संविधानचे वाचण केले व तसेच शिवसेना जिल्हा कार्यालय वाचन केंद्राला संविधान आयोजन समिती ने संविधान पुस्तक भेट दिले.
तसेच संविधान दीनानिमित्त नागलोक बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था बोर्डा, व बुद्धजीवी कर्मचारी संघ वरोरा सदस्य वनकर सर, संजय बोधेसर यांच्या हस्ते शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच शहीद जवान अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे, भारत माता कि जय असा जय घोष जवानांना श्रद्धांजली वाहताना शहीद योगेश डाहुले स्मारक जवळ करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमितभाऊ निब्रड, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकरभाऊ मिलमिले, शिवसेना शहर प्रमुख संदिपभाऊ मेश्राम, युवासेना जिल्हाप्रमुख मनिषभाऊ जेठानी,युवासेना जिल्हा सनम्व्यक दिनेशभाऊ यादव,जेष्ठ शिवसैनिक बंडुजी डाखरे सर, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे,शिवसेना उपशहर प्रमुख गजुभाऊ पंधरे, शिवसेना उपशहर प्रमुख मनिषभाऊ दोहतरे,अतुलभाऊ नांदे,पियुषभाऊ जगताप,युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे,युवासेना तालुका सनमव्यक निहाल धोटे, युवासेना उपतालुका प्रमुख अमोल काळे,युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.