Breaking News

युवासेना चिमूर तालुका तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-युवासेना प्रमुख आदित्य उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना सचिव वरुन सरदेसाई, युवासेना कार्यकारी सदस्य रुपेश कदम, हर्षल काकडे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, चिमूर विधानसभा संपर्क प्रमुख आसिफ बागवान, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे, युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे यांचे नेतृत्वात चिमूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा न्यु राष्ट्रीय विद्यालय चिमूर व श्री संत भय्युजी महाराज विद्यालय चिमूर येथे करण्यात आला.

 

यावेळी न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूर येथील गुणवंत विद्यार्थी नामे कु.नयन गुणवंत ठाकरे 96.80%, कु.वेदांत किशोर कामडी 91.00%, कु.अवंतीका दिलीप पाचभाई 92.66%, कु. मानसी रवींद्र हजारे 91.00%, कु. प्रियांशु बालाजी साटोने 89.40% यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक वर्ग ढाकूनकर मॅडम, मोहितकर सर, रोकडे मॅडम, नवाते सर आदि उपस्थित होते.

तसेच श्री संत भय्युजी महाराज विद्यालय चिमूर येथील गुणवंत विद्यार्थीनी कु.शीपाली पारस देवगडे 90.00%, कु. तनिषा दुर्योधन मेश्राम 87.60%, कु.साक्षी ईश्वर सावसाकडे 75.60% यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक वर्ग मोहिनकर मॅडम, गजभिये सर, तिडके सर, धोटे सर, पंधरे सर, लोहकरे सर, वानखेडे सर उपस्थित होते.

सत्कार कार्यक्रम प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, उपतालुकाप्रमुख सुधाकर निवटे, तालुका समन्वयक देविदास गिरडे, युवासेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे, प्रसिध्दी प्रमुख सुनिल हिंगणकर, संघटक रोशन जुमडे ,प्राध्यापक डॉ.दिवाकर कुंभरे, बाबाराव निखाडे सोनेगाव, राजहसं सातपुते सोनेगाव तसेच शिवसेना व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर …

पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved