Breaking News

अंगणवाडी ताईंना पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा : पाठपुरावा करणार

“3 हजार मिनी अंगणवाडी यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करणार, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी ताईंना वैद्यकीय उपचार मिळणार”

“आदिती तटकरे यांचं कपिल पाटील यांना आश्वासन”

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-अंगणवाडी ताईंना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आमदार कपिल पाटील यांना दिले.आमदार कपिल पाटील यांच्यासोबत अंगणवाडी ताई आणि शिक्षक भारती शिष्टमंडळासोबत अदिती तटकरे यांची काल बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, पूर्व प्राथमिक (अंगणवाडी) शिक्षक भारतीच्या नेत्या मायाताई म्हस्के, सुरेखा घाडगे, आशाताई देशमुख, प्राथमिक शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, संघटक प्रकल्प पाटील आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत अदिती तटकरे यांनी 3 हजार मिनी अंगणवाडी यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्याचे व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी ताईंना वैद्यकीय उपचार देण्याचे मान्य केले, हेल्थ इन्शुरन्सचा खर्च शासन करण्याचे , थकीत बिलं तातडीने देण्याचे मान्य केले, अंगणवाडी ताई यांना दर्जेदार मोबाईल देण्याचे व पोषण आहारामध्ये दर्जा वाढवण्याचे मान्य केले.मंत्रालयात झालेल्या बैठकीला महिला व बाल विकास विभागाचे सचिव आणि आयुक्त उपस्थित होते. आमदार कपिल पाटील आणि पूर्व प्राथमिक (अंगणवाडी) शिक्षक भारती यांच्या पुढाकाराने झालेली ही बैठक अंगणवाडी ताईंसाठी दिलासादायक असल्याची माहिती शिक्षक भारती नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे यांनी दिली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved