Breaking News

मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांचे अधिवेशनासाठी आगमन

नागपूर दि. ६ : उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आज बुधवारी आगमन झाले.

उद्यापासून अधिवेशनाची सुरुवात होणार असून सायंकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम रामगिरी निवासस्थानी होत आहे. आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील काही सदस्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील सदस्य दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर यांचेही आगमन झाले.

 

नागपूर विमानतळावर आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,सह पोलीस आयुक्त अस्वती दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी,आ.आशिष जायस्वाल यांनी त्यांचे स्वागत केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved