Breaking News

24 ते 26 मे रोजी जी.डी.सी.ॲन्ड ए व सी.एच.एम.परीक्षा

15 फेब्रुवारीपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : -शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी अँड ए.बोर्ड) कडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अँड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दि.24,25 व 26 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत दि. 15 फेब्रुवारीपर्यंत आहे. चलनाद्वारे बँकेमध्ये शुल्क भरावयाची मुदत दि. 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.

परीक्षार्थींकडून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in या खात्याच्या संकेतस्थळावरच स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड तयार करून ऑनलाईन पद्धतीनेच करता येईल. परीक्षेकरीता लागणारी आवश्यक अहर्ता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे अर्जाचा तपशील, परीक्षा शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सुट, अभ्यासक्रम व इतर तपशिलासाठी सविस्तर अधिसुचना https:sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महत्त्वाचे दुवे जी.डी.सी.अँड ए. मंडळ येथे उपलब्ध आहे. असे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved