“नागरिक झाले त्रस्त..जन्म दाखला महत्वाचे”
( माजी प्राचार्य वाय.एस.देशभ्रतार यांची मागणी )
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा) – राजेश अमरकांत कांबळे आंबेडकर नगर ,तुमसर यांच्या मुलीची जन्माची नोंद जन्म – मृत्यू लिपिक यांनी त्यांचे ताब्यामध्ये असलेल्या अभिलेखामध्ये तपासले आणि नोंदणी अभिलेखाचा शोध घेण्यात आला असता त्यांच्या निदर्शनास आले की. दिनांक 1 जाने 1997 ते दिनांक 31सप्टे 1997कर पर्यंतची पाने जीर्ण होवून गहाळ झालेली आहेत.सदर बाब माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती नुसार उजेडात आलेली आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यास शाळेत नाव दाखल करण्यास आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यास जन्म दाखल्यांची गरज भासते.अश्या परिस्थितीत नगर परिषद कार्यालयातून जन्म दाखला वेळेवर प्राप्त न होणे, दाखल्याकरीता नगर परिषद कार्यालयात वारंवार हजेरी लावणे, हा नागरिकांवर अन्याय आहे.नागरिक त्रस्त झालेले आहेत.हे दस्ता ऐवज अत्यंत महत्वाचे आहे. असे माजी प्राचार्य वाय. एस.देशभ्रतार यांनी निवेदनातून व्यक्त केले.
ते पुढे असेही म्हणाले की,नागरिकांनी वेळोवेळी आपल्या बाळांच्या जन्मांची नोंद नगर परिषद कार्यालयात केल्यानंतर त्यांना अधिकृत दाखला न मिळणे हा नागरीकांवर अन्याय आहे.नोंद घेण्याची पद्धत अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत घेण्यात आलेल्या नोंदी सुरक्षित ठेवणे आणि आवश्यकतेनुसार वेळोवेळी नागरिकांना पुरविणे ही नगर परिषद तुमसर कार्यालयाची जबाबदारी आहे. कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या ताब्यात असलेला जन्म – मृत्यूचा अभिलेख गहाळ होणे ही तुमसर नगर परिषदेच्या इतिहासातील गंभीर घटना आहे आणि सदर घटनेची दखल घेणे ही काळाची गरज आहे. दि.1-1-1997 ते 31-9-1997 नऊ महिन्यांच्या कालावधीतील जन्म – मृत्यू अभिलेखाची पाने तर गहाळ झालेलीच आहेत.तथापि अन्य कालावधीतील पाने या प्रमाणेच गहाळ झालेली असावीत अशी शंका वाय. एस. देशभ्रतार यांनी व्यक्त केलेली आहे.जन्म – मृत्यू नोंद घेण्याची पद्धत नगर परिषद कार्यालयात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत घेतलेल्या दैनंदिन क्रमवार नोंदीची तथा गहाळ झालेल्या पानांचे अवलोकन ,तपासणी करण्यात यावी.निष्काळजीपणे वर्तन करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्या विरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी आणि गहाळ झालेल्या अभिलेखाची चौकशी करण्याची मागणी माजी प्राचार्य वाय. एस. देशभ्रतार यांनी केलेली आहे.