Breaking News

पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांचा अंदाज

 

शेतकऱ्यांनी शेतमालाची  काळजी घ्यावी-गारपीटीची शक्यता

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर:-पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

गेल्या सहावर्षापासून गोगलगायीच्या गतीने काम सुरू

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परिवहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved