Breaking News

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-नेचर फाउंडेशन अभ्यासिका चिमूर, येथे दि.11 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले याची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख म्हणून निशा चौधरी ताई व. विष्णू सावसाकडे, निकील मोडक सुमित हुलके यांचे हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. “मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तावा, ज्योती म्हणे.स्त्री शिक्षणाला चालना देणारे पहिले शिक्षक, ज्यांनी अनेक अशा समाजसाठी घातक असणाऱ्या चालीरीती बंद केल्या.

आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली जयंती साजरी करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी अनेक कामे केली पण काही समाजातील लोक हे त्यांना जाती जातींनी त्यांना आता वाटून घेत आहे.या कार्यक्रमाला उपस्थित नेचर फाउंडेशन अभ्यासिकाचे सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

गेल्या सहावर्षापासून गोगलगायीच्या गतीने काम सुरू

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परिवहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved