Breaking News

संस्कार शिबिरात कार्तिक डोरले यांचा जाहीर सत्कार

जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल बेलगाव, मांडवीच्या वतीने बेटाळा येथील ग्राम विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बाल संस्कार शिबिराचे सक्रिय कार्यकर्ते कार्तिक डोरले व पदाधिकारी यांचा शाल, श्रीफळ व बदामाचे रोपटे तसेच सानुग्रह राशी देऊन जाहीर सत्कार कार्यक्रम ग्रामीण विकास संघटना बेटाळा च्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित बालसंस्कार ग्रिष्मकालीन निःशुल्क संस्कार शिबीरात नुकताच करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बेटाळा येथील सरपंचा सौ. रेश्माताई ईश्वरकर, संस्कार शिबिर प्रमुख( ग्रामीण) विलास केजरकर, लेखक अमिर शेख, राष्ट्रीय सायकल पट्टू सुशिकला आगाशे, डॉ. रत्नाकर बांडेबुचे, स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल बेलगाव, मांडवीचे शैक्षणिक प्रमुख हेमराज ( सोनू ) शेंडे, सांस्कृतिक प्रमुख हिरालाल बाभरे, पर्यावरण प्रमुख मिलिंद बाभरे, मांडवीचे माजी शाळा समिती अध्यक्ष राजु लुटे, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, मुख्याध्यापक जे. एस. आंबिलढुके, माजी मुख्याध्यापक बी. आर. रहाटे, एम. एम. कानेकर, केंद्र प्रमुख खोब्रागडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या अफाट अंधारात आपणच आपल्याला स्वयंप्रकाश पूरवायला हवा. क्रांती नव्या बदलाची, बदल नव्या अध्यायाचा तसेच कृतीशील युवा प्रगतिशील देश या संकल्पनेतून ग्रामीण विकास संघटना बेटाळा येथील संस्कार चळवळीच्या काही युवकांनी पुढाकार घेऊन ग्रिष्मकालीन निःशुल्क बालसंस्कार शिबिर, शैक्षणिक व क्रिडा मार्गदर्शन शिबीराची सुरूवात तीन वर्षांपासून केले आहे. असे मत स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल बेलगाव, मांडवीचे सांस्कृतिक प्रमुख हिरालाल बाभरे यांनी व्यक्त केले.तसेच उपस्थितांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन संस्कार शिबिराचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र राऊत व प्रास्ताविक अमीर शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार क्रिष्णा कानेटकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महेंद्र राऊत, क्रिष्णा कमाने, अविनाश राऊत, वासु कुंभलकर, शाहिणा शेख, विधी बान्ते, शितल चौधरी, सुनिल समरित, चैतन्य ठोंबरे, अविनाश मंदुरकर, प्रशांत कुंभरे, सचिन पडोळे, श्रृती ईश्वरकर, लावण्या समरित, समिक्षा कुकडे, सर्वरी डोरले, शिवानी भोयर, आरूषी ईश्वरकर, रूद्र डोरले, तेजश्विनी ईश्वरकर, आदेश बान्ते, माही राऊत, सर्वरी ईश्वरकर, वंंशिका बोरकर, आकांक्षा हरकंडे, आरजू नेरकर, ऋतुजा बागडे, वंंशिका ईश्वरकर, चैताली नेरकर, मिनल समरित, श्रेया राऊत, धनश्री बुराडे, सानिया कुकडे, स्नेहा वनवे, सायना रामटेके, श्रीनिथी चरडे, शितल चौधरी, समिक्षा शहारे, अनुजा ईश्वरकर, नेहा जिभकाटे तसेच ग्रामीण विकास संघटनेचे पदाधिकारी व बालसंस्कार शिबिरार्थ्यांनी अभिनंदन करून सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved