जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा ) – शिक्षण शिकत असतांना विविध स्पर्धा परीक्षा देऊन नौकरी मिळविणे. नौकरी मिळाली की कौटुंबिक जीवनापेक्षा नौकरीच्या माध्यमातून अनेक विकास कामात मग्न राहत असतात. त्यामुळे कुटुंबांकडे दुर्लक्ष होत असते. कारण पुरेशा प्रमाणात वेळ देता येत नाही. शासनाच्या नियमानुसार सेवानिवृत्त होणज अपेक्षित आहे. म्हणून सेवानिवृत्त म्हणजे खऱ्या अर्थाने कौटुंबिक जीवनात पदार्पण करणे होय असे प्रतिपादन उप कार्यकारी अभियंता राजेंद्र गुलाबराव बेले यांनी केले. ते भंडारा पाटबंधारे विभागाच्या वतीने आयोजित उप कार्यकारी अभियंता बेलेच्या सत्कार समारंभाला उत्तर देतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर देविलाल दमाह होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती करंजेकर मॅडम उपस्थित होत्या. तसेच विभागांतर्गत असलेले उपविभागीय अधिकारी गंगाधर हटवार, गणेश वंजारी, सुनील वाकलकर व सहाय्यक अभियंता रोशन सेलुकर, या विभागातून सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता नरेंद्र चकोले, उपविभागीय अधिकारी संजय दलाल, कनिष्ठ अभियंता चैतन्येश्वर शिवणकर, उप कार्यकारी अभियंता राजेंद्र गुलाबराव बेले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी भंडारा पाटबंधारे विभागाच्या वतीने उप कार्यकारी अभियंता राजेंद्र गुलाबराव बेले यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. व अनेक मान्यवर मंडळींकडून सुध्दा सत्कार करण्यात आला.
दोन वर्षांच्या कालावधीत जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच पाटबंधारे विभागाच्या जलजागृती सप्ताहा निमित्ताने विविध उपक्रम राबविले व त्यांनी त्यांच्या कार्याची उत्तम कामगिरी बजावली आहे. अतिशय सौम्य, मनमिळाऊ सुस्वभावाने सर्व कामांचे नियोजन करून मार्गदर्शन करणारे उप कार्यकारी अभियंता राजेंद्र गुलाबराव बेले होते. त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. असे मनोगत भंडारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर दमाह यांनी व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांनी उप कार्यकारी अभियंता राजेंद्र गुलाबराव बेले यांच्या जीवनावर आधारित विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी मनोगत व्यक्त करून राजेंद्र बेले, सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंता यांना पुढील आयुष्य सुखमय व आनंदीत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बेले यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कामात सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. .