इंस्टाग्राम वर ऑनलाईन येऊन हजारो गुतंवणूक दारांसमोर माझ्या विरोधात तक्रार अर्ज करणारे आणि माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करणाऱ्यांना मारून टाकण्याची साईनाथ कवडे याची भाषा
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की गेले काही महिने हजारो सर्वसामान्य गुतंवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन फरार असलेला शेवगांव तालुक्यातील सर्वात मोठा बिगबूल उर्फ शेअर ट्रेडर्स साईनाथ उर्फ साई कवडे रा. रावतळे कुरुडगाव ता शेवगांव काल दिनांक 28 ऑगष्ट वार बुधवार रोजी रात्री. 08:15 वाजता इंस्टाग्राम वर ऑनलाईन येऊन हजारो गुतंवणूकदारांसमोर माझ्या विरोधात तक्रार अर्ज करणारे आणि माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करणाऱ्यांना मारून टाकण्याची व त्याची जबाबदारी घेण्याची मग्रुरीची भाषा साईनाथ कवडे याने काल दिनांक 28 ऑगष्ट रोजी रात्रौ 08:15 ते 09:15 Live येत त्याच्या चेल्या चपाट्याना त्याच्या विरोधातील तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांना सरळ सरळ जीवे मारण्याची वध करण्याची धमकी देतो.
हजारो लोकांच्या कोट्यवधींच्या ठेवी आपल्या बुडाखाली दाबुन अज्ञातवासात असलेला अहमदनगर पोलिसांच्या नाकावर टीचचुन राजरोस लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारा आणि मी गावाकडे आल्यावर एकेकाचा बेत पाहण्याची भाषा करणारा पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी गुप्तचर विभाग आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांना दिसत नाही का का सरकारी सिस्टीमच त्याला सपोर्ट करत आहे लोकांचे कोट्यावधी रुपये गोळा करताना सहा महिने एक वर्ष आणि तीन वर्षाच्या मुदतीवर पैसे घेताना माझ्या सवडीने मी तुम्हाला पैसे परत करील असे त्याचवेळी जर सांगितले असते तर लोकांनाही पैसे गुंतवताना विचार केला असता आता बुडाखाली कोट्यवधी रुपये दाबून सोशल मीडियावर पोपटासारखा धमक्या द्यायला गंमत वाटते.
*ताजा कलम*
*शेवगाव तालुक्यातील सुमारे 50 ते 60 शेअर ट्रेडर्स बिग बुल्स फरार असून त्यातील मोजकेच पोलिसांच्या हाती लागली आहेत त्या सर्वांचा मोरक्या साई कवडे असून त्याला पोलीस प्रशासन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सक्तवसुली संचालनालय ई.डी. यांच्याकडून काही खास वागणूक मिळते का ???अशी शंका सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पडली आहे हजारो कुटुंबाची फसवणूक करणाऱ्या साई कवडे ला प्रोटेक्शन देते कोण ??? त्याचबरोबर त्या बड्या धेंडावरही गुन्हे दाखल होणार का ??? गुन्हे दाखल करायला पोलीस प्रशासन कशाची वाट पाहत आहे दोन पाच सामाजिक कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांचे बळी गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होणार आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*