Breaking News

अरुणा काकडेचे अपहरण की घातपात – पाच दिवसानंतरही शोध लागला नाही

चिमूर व्यापारी असोसीएशनचे पोलिस निरीक्षकाचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे पाच दिवसापासून बेपत्ता असून अरूणाचे अपहरण आहे की घातपात यांचा तातडीने शोध घेण्याबाबत. व्यापारी असोसीएशन चिमूर कडून पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली मागणी‌. व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे वय अंदाजे 37 वर्ष ह्या दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोज मंगळवारला नेहमीप्रमाणे सकाळी चिमूर नागपुर बसने नागपुर येथे दुकानातील सामान खरेदी करिता नागपुर येथील ईतवारी मार्केट मध्ये गेल्या होत्या.

मिळालेल्या माहितीच्या आधारे असे कळले की अरुणा अभय काकडे ह्या सकाळी चिमुर येथून नागपुर बस स्टैंडला पोहोचल्या नंतर तिथून ऑटोने तीन नल चौक, ईतवारी येथे पोहोचल्या त्यानंतर  ईतवारी भंडारा रोड येथील बाटा शोरूम समोरून  हरवलेल्या आहेत. दिनांक 26 नोव्हेंबरपासून सौ. अरुणा अभय काकडे यांच्या आप्त स्वकीयांनी शोध घेऊन त्यांचा ठावठिकाणा न लागल्यामुळे पोलिस तक्रार दाखल केली आहेत.

सदर घटना घडून आजपावेतो 5 दिवस होऊन सुद्धा अरुणा अभय काकडे यांचा पत्ता न लागल्यामुळे अपहरण किवा अन्य घातपात होण्याची संभावना आहे. याकरिता प्रकरणाची सखोल चौकशी करून अरुणा अभय काकडे यांच्या शोध घेण्यात यावा. यासाठी पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सातपुते,सचिव बबन बनसोड,प्रशांत गगपल्लीवर,घनश्याम चांदेकर, अभय धोपटे,आशिष असावा,विनोद शर्मा,ॲडव्होकेट लांबट उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहिदांच्या चिमूर क्रांती भूमीला जिल्ह्याचा दर्जा केव्हा प्राप्त होणार

* सलग तिसऱ्यांदा हॅट्रीक पटकाविणाऱ्या आमदार बंटी भांगडिया कडून चिमूर विधानसभा वासीयांची चिमूर जिल्हाची आशा …

सीडीसीसी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण लागू करा

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे मनसेची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved