Breaking News

नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरीक संतप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यातील भिसी येथिल प्रभाग क्रमांक १३ मधील रहिवासी सौ. शिल्पा अजय शिवरकर यांच्या घरासमोर असलेल्या नगरपंचायतच्या बोरिंगवर पाणी भरण्याकरिता गेल्या असता त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला परंतू म्हणतात ना “देव तारी त्याला कोण मारी” त्याप्रमाणे परिसरात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिलेला तात्काळ डॉ. गायकवाड यांच्या रुख्मिणी हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी प्रथमोपचार करुन महिलेचा जीव वाचविला.

विशेष असे की सदर महिलेला सहा महिन्याचे छोटेसे बाळ आहे.

भिसी नगरपंचायत स्थापनेपासून भिसी येथे प्रशासक कारभार चालू आहे या प्रशासक राजांमध्ये जे नियुक्त प्रमुख कर्मचारी आहेत ते कर्मचारी चिमूर येथून भिसी नगरपंचायतचा कारभार (पाहतात) सांभाळत आहेत. त्यामुळे यांचे या गावात तसेच नगरपंचायत मध्ये येणे हे पाहुण्यांसारखे झालेले आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक कर्मचाऱ्यावर कोणाचेही वचक राहिलेला नाही.एवढ्या मोठ्या लोकसंख्येने व क्षेत्रफळाने विस्तीर्ण नगरपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांनी स्थायी राहायला पाहिजे परंतु राहत नसून इथला कारभार चिमूर वरूनच हाकत आहेत.

या नादुरुस्त टाकी व बोरिंग बाबतीत प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांनी मागील चार महिन्यापासून अनेकदा नगरपंचायतला सूचना केलेल्या आहेत की आमच्या प्रभागात असलेली टाकी व उभे केलेले शेड हे जीर्ण झालेले आहे. परंतु कोणीही वाली नसल्यासारखे या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज बुधवारला तर चक्क असा प्रकार घडला की पाणी भरायला गेलेली सौ. शिल्पा अजय शिवरकर ही महिला विजेचा शॉक लागल्याने खाली नालीमध्ये पडली नशीब बलवत्तर म्हणून सदर महिला नागरिकांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावली.

जेव्हा त्या महिलेला विजेता शॉक लागला तेव्हा त्या बोरिंगची पाहणी केली असता त्या ठिकाणी विजेचा पुरवठा हा डायरेक्ट केलेला आढळला. तसेच गावातील अनेक बोरवेल वरती हीच परिस्थिती असल्याचे लक्षात येते असून त्या ठिकाणी असलेले सर्व साहित्य जीर्ण झालेले आहे. त्याची रिपेरिंग सुद्धा केलेली नाही. तेथील टाकी बरेच दिवसापासून बाजूला काढून ठेवलेली आहे. म्हणून नागरिकांना वारंवार इलेक्ट्रिक बटन दाबावी लागते.परिसरात अनेक लहान लहान मुलं त्या बोरिंग जवळ खेळत असतात चुकून एखाद्या वेळेस असाच विद्युत पुरवठा सुरू राहीला आणि एखाद्याचा जीव गेला तर याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासन घेणार का? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडलेला आहे.

विजेचा शॉक लागल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाला फोन केला असता तेथील कर्मचाऱ्यांनी मोटरपंप सुरू करण्याकरिता लाकडाच्या काडीने बटन उचलत जा व सुरु करत चला अशी अफलातून आयडिया दिली.आता तरी नगरपंचायत प्रशासन या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देऊन गावातील नादुरुस्त टाक्या दुरुस्त करावी अशी मागणी गावकरी करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहिदांच्या चिमूर क्रांती भूमीला जिल्ह्याचा दर्जा केव्हा प्राप्त होणार

* सलग तिसऱ्यांदा हॅट्रीक पटकाविणाऱ्या आमदार बंटी भांगडिया कडून चिमूर विधानसभा वासीयांची चिमूर जिल्हाची आशा …

सीडीसीसी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण लागू करा

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे मनसेची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved