चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/चिमूर :- व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे दहा दिवसापासून बेपत्ता असून अरूनाचे अपहरण आहे की घातपात यांचा तातडीने शोध घेण्याबाबत. चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघा कडून अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे वय अंदाजे 37 वर्ष ह्या दिनांक 26 नोव्हेबर 2024 रोज मंगळवार ला नेहमीप्रमाणे सकाळी चिमूर नागपुर बसने नागपुर येथे दुकानातील सामान खरेदी करिता नागपुर येथील ईतवारी मार्केट मध्ये गेल्या होत्या मिळालेल्या माहितीच्या आधारे असे कळले की अरुणा अभय काकडे ह्या सकाळी चिमुर येथून नागपुर बस स्टैंड ला पोहोचल्या नंतर तिथून ऑटो ने तीन नल चौक, ईतवारी येथे पोहोचलया त्यानंतर त्या ईतवारी भंडारा रोड येथील बाटा शोरूम समोरून त्या हरवलेल्या आहेत.
दिनक 26 नोवेंबर पासून अरुणा अभय काकडे यांच्या आप्त स्वकीयांनी शोध घेऊन त्यांचा ठावठिकाणा न लागल्यामुळे पोलिस तक्रार दाखल केलेली आहेत.
सदर घटना घडून आजपावेतो 10 दिवस होऊन सुद्धा अरुणा अभय काकडे यांचा पत्ता न लागल्यामुळे अपहरण किवा अन्य घातपात होण्याची संभावना आहे. करिता प्रकरणाची सखोल चौकशी करून सौ अरुणा अभय काकडे यांच्या शोध घेण्यात यावा या करिता अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जंनबंधू यांना निवेदन देण्यात आले.यावेळी चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सदानंद खत्री जिल्हा उपाध्यक्ष. प्रवीण सातपुते. प्रकाश पापांपत्तीवार. कोषाध्यक्ष अनिल गुप्ता. चिमूर व्यापारी असोशीयशांचे सचिव बबन बनसोड. भद्रावती व्यापारी असोसिएशनचे. शेख. चंद्रपूर चेंबरचे उपाध्यक्ष विनोद बजाज. सदस्य नारायण तोषनिवाल. चिमूर व्यापारी असोसियशंनचे प्रशांत चीडे. अविनाश अगडे. नागेश चट्टे. बालू सातपुते व चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.