Breaking News

रेती चोरट्यांची वाढली दादागिरी – चक्क शासकीय कामात अडथळा निर्माण

जप्त केलेले गौण खनिज व रेतीने भरलेला ट्रॅक्टर जबरदस्तीने हिसकावून पळवीला

चिमूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक. ०४ डिसेंबर २०२४ ला फिर्यादी मिलिंद किसन किटे वय ४२ वर्षे पद वनरक्षक वनसंरक्षण व अतिक्रमण निर्मूलन बफर चंद्रपूर व सोबतचे गस्त पथक हे शासकीय सेवक असुन शासकीय गणवेशात चंद्रपुर येथुनही शासकीय वाहन क्रमांक MH-34-AV-1708 या वाहनाने खडसंगी वनपरिक्षेत्र येथे गस्त करीत असताना त्यांना मिळालेला गौण खनिज रेतीने भरलेला ट्रॅक्टर बिना क्रमांकाचा जप्ती व पंचनामा करून खडसंगी येथील कार्यालयाकडे घेवुन येत असताना पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH-46-W-5880 मधील दंबग व्यक्ती व आरोपी टॅक्ट्रर चालक नामे नाव सोनल ज्ञानेश्वर मेश्राम वय २६ वर्षे रा. खडसंगी हे जबदरस्तीने व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

फिर्यादी व त्यांचे पथक यांचे ताब्यातुन जप्त गौण खनिज रेतीने भरून असलेला निळ्या रंगाचा मुंडा व लाल रंगाची ट्रॉली बिना नंबरची व तिचे मुंडावर समोरून नंबर लिहण्याचे ठिकाणी लाल रंगाने लाल बादशाहा असे मराठीत लिहलेला ट्रॅक्टर व ट्रॉली सहित किंमत ५,०००००/- रु. व एक ब्रॉस रेतीची किं. ६०००/- रु. असा एकुण ५०६०००/- रु. माल ट्रॅक्टर चालक व स्कॉर्पिओ मधील व्यक्ती घेवुन गेले अशी फिर्यादीने दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल करून ४२३/२०२४ कलम २२१, ३०९ (४), ३५१ (२) भा. न्या. सं. अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक घनश्याम नवखरे व पोलीस पथक करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहिदांच्या चिमूर क्रांती भूमीला जिल्ह्याचा दर्जा केव्हा प्राप्त होणार

* सलग तिसऱ्यांदा हॅट्रीक पटकाविणाऱ्या आमदार बंटी भांगडिया कडून चिमूर विधानसभा वासीयांची चिमूर जिल्हाची आशा …

सीडीसीसी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण लागू करा

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे मनसेची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved