जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे वय ३७ वर्ष ह्या दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोज मंगळवारला नागपूर येथे दुकानातील समान खरेदी करण्याकरिता गेली असता इतवारी भंडारा रोड येथील बाटा शोरूम नागपूर समोरून हरविल्या होत्या.आज दिनांक १० डिसेंबरला बेपत्ता अरुणा काकडेचा मृतदेह पोलिसांना सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने सांगितले की २६ नोव्हेंबर रोजी अरुणा काकडे मला भेटली होती, अरुणा ही माझी वर्गमैत्रिण होती, त्यामुळे आमची चांगली ओळख होती.
त्यादिवशी आम्ही दिवसभर सोबत होतो, त्यानंतर रेशीमबाग मैदानावर आमच्या दोघात वाद झाला, मी यावेळी रागाच्या भरात अरुणा चा गळा आवळून खून केला व त्यानंतर आपल्या चारचाकी वाहनात अरुणा चा मृतदेह टाकत बेसा येथील निर्जन स्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाक्यात तिचा मृतदेह टाकला व तिथून निघून गेलो. २०२३ यावर्षात चंद्रपूर शहरामध्ये विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे घडले असून गुन्ह्याचा तपास रामनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे करीत होते. त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याला अटक केली.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक दरम्यान आयपीएल व सट्टा बाजारात लाखोंचे कर्ज अंगावर झाल्याने डाहूले यांनी घरफोडी चे गुन्हे करण्यास सुरुवात केली. घरफोडी प्रकरणात आरोपी हा पोलीस कर्मचारी असल्याने चंद्रपूर पोलीस विभागाची चांगलीच बदनामी झाली होती, त्यानंतर नरेश डाहूले ला पोलीस विभागाने बडतर्फ केले होते. आता पुन्हा वर्षभरानंतर नरेश डाहूले ला हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.