जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- भद्रावती वरोरा विधानसभा निवडणुकीत भल्याभल्यांना त्यांची जागा दाखवुन दिली असे मुकेश जिवतोडे यांना शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले होते मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा चंद्रपूर जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांच्याकडे चंद्रपूर व वरोरा विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे.
वरोरा विधानसभेची जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला गेल्यानंतर मुकेश जिवतोडे यांनी बंडाचे निशाण फडकवित आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यांनी प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार करण देवतळे यांना चांगली टक्कर देत ५० हजारांच्या आसपास मते घेतली व ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. याची दखल घेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मुकेश जिवतोडे यांच्यावर विश्वास दाखवित त्यांची चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या या नियुक्तीचे जंगी स्वागत करण्यात आले.