नागपूर, ता. १९ : देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्या-या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी स्व.इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे “राष्ट्रीय एकात्मता” दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
म.न.पा.सिव्हील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे व सहाय्यक आयुक्त श्री. महेश धामेचा यांनी स्व.इंदिरा गांधींच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन आदरांजली दिली तसेच उपस्थित अधिकारी/कर्मचा-यांना श्री. राम जोशी यांनी “राष्ट्रीय एकात्मतेची शपथ” दिली.
यावेळी जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, सामान्य प्रशासन विभागाचे अधिक्षक मदन सुभेदार, सहा. अधिक्षक मनोज कर्णिक, ललित राव, बालकृष्ण पलांदुरे, राजेश वासनिक, जगदीशसिंह बैस, राजेश लोहीतकर, शुभम धकाते, अनित कोल्हे, यांच्यासह अधिकारी/कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.