Breaking News

भिसी पोलीसांचा अनोखा उपक्रम अंधश्रद्धेवर जनजागृती कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

भिसी :- चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात घडलेल्या अंधश्रद्धेच्या घटनांमुळे सामान्य जनता हादरली आहे. एकीकडे अशा घटनांमुळे निरपराध लोकांवरील अन्यायाच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे पोलीस विभागाची डोकेदुखीही वाढली आहे. भिसी पोलीस विभाग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील पोलीस पाटलांना अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती देण्यासाठी व त्यावर आळा घालण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अमोद गौरकर यांनी उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. गौरकर यांनी समाजात पसरलेल्या विविध अंधश्रद्धांविषयी सविस्तर माहिती दिली आणि त्यावर उपाय योजनाही सांगितली. समितीचे चिमूर तहसील संघटक सारंग भीमटे यांनी विविध प्रयोग सादर करून व अनेक उदाहरने देऊन मार्गदर्शन केले. स.पो.नि. प्रकाश राऊत यांनीही उपस्थितांना अंधश्रद्धेच्या बाबतीत पोलिसांच्या भूमिकेची माहिती दिली.
भिसी पोलीस स्टेशन द्वारा आयोजित कार्यक्रमात स. पो. नि.प्रकाश राऊत, अभा अनिसचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य पंकज मिश्रा, सहाय्यक. उपनिरीक्षक सचिन जंगम, भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत गावाचे पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, गणेश मंडळाचे सदस्य, होमगार्ड उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved