
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-1 से 7 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. भारतातील वनस्पती आणि वन्यप्राणी यांचे संरक्षण आणि जतन करणे हे या सप्ताहाचे उदिष्ट आहे. संकट प्रस्ताव असलेल्या आणि धोका असलेल्या वन्यजीवप्राण्याच्या जिवांचे रक्षण करण्याच्या उदिष्ठांने हि संकल्पाना सुरू करण्यात आली आहे.
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र कोलारा अंतर्गत दिनांक 04 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 8.00 ते 12.00 वाजेपर्यंत जिप्सी रॅलीबाबत आयोजन केले. वनअधिकारी / वनकर्मचारी कोलारा परिक्षेत्र, विशेष व्याघ्र संरक्षण दल चिमूर कोलारा गावातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, कोलारा पर्यटन गेट येथील सर्व मार्गदर्शक जिप्सी धारक, चालक,
कोलारा, सातारा, बाम्हणगाव या गावातील प्रतिष्ठित नागरीक व इतर वरील सर्वांनी मिळुन कोलारा गेट ते कोलारा सातारा- बाम्हणगाव- टेकेपार वरून तळोधी, केसलापार मार्गे चिमूर फॉरेस्ट ऑफीस समोरून मेन रोड चिमूर येथे वन्यजीव सप्ताहाचे घोषणा देत तहसिल कार्यालय जवळ जिप्सी रैली आली.
त्यावेळेस प्रकाश संकपाळ उपविभागीय अधिकारी, चिमूर, सौ. प्राजक्ता बुरांडे रेळेकर तहसिलदार चिमूर, मनोज गमणे पोलीस निरिक्षक, चिमूर, प्रदिप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी, कोलारा यांनी वन्यजीव सप्ताह जिप्सी रॅलीला हिरवा झेंडा दिला. तद्नंतर जिप्सी रॅली चिमूर बायपास मार्गे कोलारा पर्यटन गेट येथे येडुन जिप्सी रॅलीची सांगता करण्यात आली.