
पत्रकार विकास खोब्रागडे यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन केले सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-खडसंगी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बहुजन विचार बहुउद्देशीय संस्था खडसंगी व चिमूर प्रेस मिडीया फाऊंडेशन चिमूर शाखा खडसंगीच्या वतीने नुकताच श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा ग्रामीण वार्ता प्रथम पुरस्कार प्राप्त पळसगांव येथील ग्रामीण भागातील दैनिक लोकमतचे पत्रकार विकास खोब्रागडे यांना दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन संविधान प्रास्ताविका आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाला चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (ठाणेदार) मनोज गभणे यांच्या सह चिमूर मिडीया फाऊंडेशन चिमूर चे अध्यक्ष पंकज मिश्रा भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत,ग्रामपंचायत खडसंगीचे सरपंच प्रियंका कोलते, उपसरपंच संदीप भोस्कर, माजी पंचायत समिती सदस्य अजहर शेख, वैद्यकीय अधिकारी श्रीकांत रणदिवे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. रविंद्र वाभिटकर, तलाठी वैभव कार्लेकर, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक मत्ते, भिमज्योती संस्थेचे अध्यक्ष गौतम रामटेके, माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे, तसेच मान्यवर व पत्रकार बंधुं कार्यक्रमाला उपस्थित होते.