
दिपक खाडे
पनवेल:-दिनांक-30/02/23 ला पनवेल मनपा अंतर्गत महिला व बालविकास विभागार्फत मनपाच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थिनी आणि त्यांच्या माता पालकांसाठी “मासिक पाळी शाप की वरदान?” या विषयान्वये जनजगृतीचे कार्यक्रम घेण्यात आले.
समाजातील मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करून, मुली तसेच महिलांना मासिक पाळीच्या दिवसात दिली जाणारी दुय्यम दर्जाच्या वागणुक काशी चुकीची आहे हे सांगून त्या दिवसात सुद्धा आत्मविश्वासाने जगण्यासाठी प्रेरित केले.याविषयी नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशन तसेच स्मार्ट चॉईस च्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमात दिपक खाडे (समुपदेशक) यांनी मार्गदर्शन केले.त्यामध्ये विध्यर्थिनी आणि माता पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमामध्ये स्मार्ट चॉईस सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात आले.विविध शाळेत झालेल्या या उपक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच प्रणिता राणे, संजीव पार्थे, शाळेतील शिक्षिका, आणि माता पालक उपस्थित होत्या.