Breaking News

तहसीलदार तुळसीदास कोवे झालेत सेवानिवृत्त – कोवे ठरलेतं एक दिवसीय तहसीलदार

चिमूर तहसील कार्यालयात निरोप समारंभ संपन्न 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-तहसीलदार तुलसीदास कोवे सेवानिवृत्त झाले असून वडसा तहसील कार्यालयचे एक दिवसाचा कार्यभार सांभाळुन ते सेवानिवृत्त झाले, चिमूर तहसील कार्यालयामध्ये त्यांना निरोप देण्यात आला.चिमूर तहसील कार्यालयात मागील पाच वर्षांपासून कार्यरत असलेले नायब तहसीलदार तुलसीदास कोवे यांना दोन महिन्यापूर्वी राज्य सरकार कडून पदोन्नतीचा आदेश आला. परंतु पदभार कुटल्याच तहसील कार्यालयचा मिळाला नव्हता त्यामुळे ते चिमूर येथेच कार्यरत होते. 31 मे ला त्यांची सेवानिवृत्ती होती व निरोप देण्याची तयारी सुरू होती.

मात्र 31 मे ला दुपारीच नायब तहसीलदार तुलसीदास कोवे यांना गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील तहसील कार्यालयात तहसीलदार पदी पदस्थापनेचे आदेश मंत्रालयातून धडकले त्यामुळे तुलसीदास कोवे वडसा येथील तहसील कार्यालयात 31 मे ला तहसीलदार पदावर दुपारी रुजू झाले व त्याच दिवशी सायंकाळी निवृत्ती मिळाली.वडसांचे तहसीलदार तुलसीदास कोवे यांच्या कार्याची दखल घेऊन चिमुरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाल यांचे प्रमुख उस्थितीमध्ये तहसीलदार कोवे यांना निरोप देण्यात आला यावेळी चिमुरच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, नायब तहसीलदार आशिष फुलके, पवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम सहित तहसीलच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved