
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी चिमूर पोलीस ठाणे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदाच्या रिक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. चिमूर पोलीस ठाण्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे हे सेवानिवृत्त झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या पदावर नवीन नियुक्त अधिकारी न आल्याने वरोरा पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी हे उपविभागीय पोलीस ठाण्याचे कामकाज पाहत होते.
अखेर चिमूर पोलीस ठाण्यासाठी नवनियुक्त पोलीस अधिकारी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी २९ में रोजी चिमूर येथे पोहोचून चिमूर पोलीस उपविभागीय कार्यालयाचा पदभार स्वीकारला. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी. चोरी आणि डकैतीला प्रतिबंध, सट्टा, जुगार अवैध व्यवसाय या गोष्टींना आळा घालण्याची जबाबदारी नवनियुक्त उपविभागीय अधिकारी राकेश जाधव किती समर्थपणे सांभाळतात याकडे चिमूरच्या नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.