
नागरिकांनी वाहिली आदरांजली
तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:- इंग्रजा विरुद्ध लढा देऊन सळो की पळो करून सोडणारे महामानव जननायक भगवान क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम ट्रायबल फोरम शाखा दहेगावच्या वतीने शिवाजी चौक येथे घेण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी मारोती डाहुले ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख अतिथी शंकर पंधरे तालुकाध्यक्ष ट्रायबल फोरम राळेगाव, तालुका उपाध्यक्ष सुनील मेश्राम, शाखा अध्यक्ष अजय जुमनाके, शाखा महासचिव सुरज सलाम, देवेंद्र सलाम, सुधाकर मडावी, रोशन मेश्राम, रमेश सलाम, यांची होती. याप्रसंगी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेंद्र जुमनाके, समीर परचाके, सुशिल आत्राम, करण परचाके, प्रफुल कुळसंगे तथा सर्व समाजबांधवाची उपस्थिती होती.